Nagpur : दोन बसेसच्या धडकेत सतरा प्रवासी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : दोन बसेसच्या धडकेत सतरा प्रवासी जखमी

चांपा : प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस आणि एसटी महामंडळाच्या बसमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण सतरा प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता पाचगाव बसस्थानकाजवळ घडला.

एमएच४९, जे२३९० ही खासगी तर एमएच४०, एन९००८ क्रमांकाची महामंडळाची एसटी ह्या दोन बसेस उमरेड येथून नागपूरकडे निघाल्या होत्या. दोन्ही बसेस पाचगाव बसस्थानकाजवळ आल्या असता एसटी महामंडळाच्या बसने मागून जोरदार धडक दिली. धडक बसताच खासगी बस बाजूला असलेल्या शेतात घुसली. या अपघातात दोन्ही वाहनातील १७ प्रवासी जखमी झाले.

घटनास्थळी कुही पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाचगाव पोलिस चौकीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक शिवाजीराव बोरकर, हरिहर सोनकुसरे, सहायक फौजदार विजय कुमरे, पोलिस अंमलदार पवन सावरकर, दुर्गेश डहाके पोहोचले. जखमी प्रवाशांना त्वरित पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आणि नंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले, अशी माहिती पाचगावचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार यांनी दिली आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Web Title: Bus Accident Two St Bus Champa Road Corporations Bus On Land

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..