Nagpur News: वेतन, बोनससाठी कामगारांचे ‘भीक मांगो’ आंदोलन; दीड हजार कामगारांचा बुटीबोरी नागपूर मार्गांवर ठिय्या
Workers Protest: एमआयडीसी बुटीबोरी येथील मोरारजी टेक्सटाईल कंपनीतील तब्बल दीड हजार कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन आणि दिवाळी बोनस थकीत आहे. याविरोधात संतप्त कामगारांनी गुरुवारी सकाळी ‘भीक मांगो’ आंदोलन करीत मोर्चा काढला.
टाकळघाट : एमआयडीसी बुटीबोरी येथील मोरारजी टेक्सटाईल कंपनीतील तब्बल दीड हजार कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन आणि दिवाळी बोनस थकीत आहे. याविरोधात संतप्त कामगारांनी गुरुवारी सकाळी ‘भीक मांगो’ आंदोलन करीत मोर्चा काढला.