Gas Cylinder : चुलीकडे जाता येईना, सिलेंडर परवडेना

महागाईचा फटका; अर्थसंकल्पातून दिलासा नाहीच
 can not afford gas cylinder inflation budget 2023 nagpur
can not afford gas cylinder inflation budget 2023 nagpursakal

द्रुगधामना : गेल्या काही वर्षांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. सिलिंडरचे दर एक हजार रुपयापेक्षा अधिक झाले असून, गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. वाढलेल्या महागाईमुळे जुन्या काळाप्रमाणे चुलीवर स्वयंपाक करणेही आता सोयीचे राहिले नाही. केंद्राचा अर्थसंकल्पात भरीव तरतूद नसल्याने गरिबांची चांगलीच कोंडी होत आहे.

सुरुवातीला उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात सिलिंडर उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभसुद्धा घेतला. मात्र आता सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागडे सिलिंडर घेताना मोठी कसरत करावी लागते.

त्यामुळे शासनाने सिलिंडरच्या दरात कपात करावी, अशी मागणी केली जात आहे. ग्रामीण भागातील महिलांना आता गॅसवर स्वयंपाकाची सवय झाली आहे. परंतु सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढतच असल्याने स्वयंपाक करायचा असा असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. सिलिंडरचे दर कमी करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होते. विशेष म्हणजे आता सबसिडीही अत्यंत कमी झाली.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर जानेवारी २०२२ तुलनेत २३५ रुपयांनी कमी झाले. परंतु घरगुती सिलिंडर मात्र १५४ रुपयांनी वाढले आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात इंधनाबाबत तरतूद नसल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली.

दर वाढता वाढे

महिना - घरगुती - व्यावसायिक

१ जुलै (२०२२) - १०५५ - २१८२

१ डिसेंबर (२०२२) - ११०५ - १८९९

१ जानेवारी (२०२३) - ११०५ - १८९९

दरवर्षी मोठा गाजावाजा करून अर्थसंकल्प सादर केला जातो. वेगवेगळ्या वर्गासाठी भरीव तरतूद केली जाते. परंतु सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. आज महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. गरिबांना दोन वेळच्या जेवणासाठी राबराब राबावे लागते. असे असताना महागाई कमी करण्याच्या दृष्टीने काहीतरी भरीव तरतूद होणे गरजेचे होते. सिलेंडरचे दर कमी व्हावे ही गृहिणींची अपेक्षा आहे.

-सविता पांडे, गृहिणी, पिपळा फाटा, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com