
Women's Health Checkup: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) पुढाकारातून मागील ७ महिन्यात १ लाख १०८ महिलांची कॅन्सररोग तपासणी करण्यात आली.
यात गर्भाशयाच्या कॅन्सरसह स्तन कॅन्सरच्या संशयित ८९४ महिला आढळून आल्या आहेत. या महिलांची पुढील तपासणी व उपचारासाठी पाठपुरावा केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची कॅन्सर तपासणी पहिल्यांदाच झाली आहे.