
नागपूर : महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजकडे कारने निघालेल्या कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील भाविकांच्या वहनाला देवलापार नजिक अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ८ प्रवासी जखमी झाले असून त्यात ९ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. सर्वांवर मेयोत उपचार सुरू आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून ते सुखरूप बचावले. पण, या घटनेमुळे त्यांची संगमावर आंघोळीची इच्छा अपूर्ण राहिली.