ओबीसी विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र? मागासवर्ग कल्याण विभागाने मागितले शासनाकडे मार्गदर्शन

व्यावसायिक सोबत बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यक असल्याची अट शासन आदेशात आहे. परंतु आता काढलेल्या परिपत्रकात त्याचा उल्लेख नाही.
OBC Hostel in Nagpur
OBC Hostel in Nagpur Esakal
Updated on

Caste Validitya Certificate Required for OBC Hostel Admission: व्यावसायिक सोबत बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यक असल्याची अट शासन आदेशात आहे. परंतु आता काढलेल्या परिपत्रकात त्याचा उल्लेख नाही.

त्यामुळे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र लागणार की नाही, याबाबतचे मार्गदर्शन इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाकडून शासनाकडे मागण्यात आले. हे मार्गदर्शन आल्यावरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते.

इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या मंत्र्यांकडून ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही घोषणा प्रत्यक्षात उतरायला बराच वेळ लागला. सुरुवातीला विभागाने फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी झाली. (Latest Marathi News)

त्यानंतर शासनाने ३० टक्के प्रवेश बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना देण्याचा शासन आदेश काढला. यात जात वैधता प्रमाणपत्राची अट घालण्यात आली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. आता याबाबतचे एक परिपत्रक काढण्यात आले. यानुसार वर्ष २२३-२४ करिता विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षात पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल.

OBC Hostel in Nagpur
Muslim Marriages Act: कितीही कायदे करा, पण मुस्लीम फक्त...; सपा खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

२.५० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून यात १०० मुली व १०० मुलांचा समावेश असणार आहे. परंतु या परिपत्रकात जातवैधता प्रमाणपत्राबाबत कोणताही उल्लेख नाही.

शासन आदेशात मात्र जात वैधता प्रमाणपत्राचा उल्लेख आहे. त्यामुळे जातवैधता प्रमाणपत्राबाबत विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. हे मार्गदर्शन आल्यावरच प्रत्यक्षात प्रवेशाची कार्यवाही सुरू होणार असल्याचे समजते. (Latest Marathi News)

OBC Hostel in Nagpur
Muslim Marriages Act: कितीही कायदे करा, पण मुस्लीम फक्त...; सपा खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com