

Nagpur News
esakal
नागपूर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बुधवारी (ता.१३) जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात शहरातून भारतीय विद्या भवनच्या सिव्हील लाईन्स शाखेतून वाणिज्य शाखेत अथर्व लाहोटी याने ९८.४ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर ह्युमॅनिटीज शाखेतून श्रीकृष्णनगर शाखेतून विधी तिवारी हिने ९७.४ टक्क्यासह तर विज्ञान शाखेतून सेंट पॉल स्कूलच्या मृण्मयी मेश्राम हिने ९७ टक्क्यांसह शहरात प्रथम स्थान पटकाविले.