नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. गेल्यावर्षीच्या निकालाची तुलना केली असता, यंदा बारावीच्या निकालात ०.४१ टक्क्यांची अल्पशी वाढ झाली आहे..निकालात मुलांच्या तुलनेत यंदाही मुलींनी सरस कामगिरी केली असून ९१.६४ मुली तर ८५.७० टक्के मुले उत्तीर्ण झाली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.९४ टक्क्यांनी अधिक आहे.सीबीएसई बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल यादरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. राज्यात ५६१ शाळा असून त्यातील ३२२ केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत देशातील १७ लाख ४ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती..त्यापैकी १९ हजार २९९ शाळेतून ७ हजार ३३० केंद्रांवर १६ लाख ९२ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ९६ हजार ३०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.३९ इतकी आहे. गेल्यावर्षी ही टक्केवारी ८७.९८ इतकी होती. यात महाराष्ट्रातील विद्यार्थी हे पुणे विभागात येत असून यंदा पुणे विभागातील निकाल ९०.९३ टक्के इतका लागला आहे..यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५.९४ टक्क्यांनी अधिक उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय परीक्षेत बसलेल्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे..निकालात जवाहर नवोदय विद्यालय प्रथमबारावी सीबीएसई निकालात जवाहर नवोदय विद्यालयाने देशात प्रथम स्थान पटकाविले आहे. देशात असलेल्या या विद्यालयातील ९९.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय केंद्रीय विद्यालयातील ९९.०५ टक्के,एसटीएसएस शाळांमधील ९८.९६ टक्के, शासकीय अनुदानित विद्यालयातील ९१.५७ टक्के, शासकीय ९०.४८ तर खासगी शाळेतील ८७.९४ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होवू शकले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.