Operation Sindoor : भारताचा युद्धबंदीचा निर्णय योग्यच; कर्नल अभय पटवर्धन यांनी ‘सकाळ’शी साधला संवाद
Colonel Patwardhan : भारताने घेतलेला युद्धबंदीचा निर्णय योग्य असून, ऑपरेशन सिंदूर संपलेले नसून केवळ स्थगित करण्यात आले आहे, असे माजी सैन्याधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले. त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना पाकिस्तानच्या हालचालींवरही कठोर इशारा दिला.
नागपूर : भारतासमोर टिकाव लागणार नाही, हे लक्षात आल्याने युद्धबंदीचा प्रस्ताव पाकिस्तानकडून आला. भारताने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र यानंतर पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल.