मोफत बूस्टर डोस १५ दिवसांनी होणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Government Free Booster Dose

मोफत बूस्टर डोस १५ दिवसांनी होणार बंद

नागपूर : केंद्र सरकारने सुरू केलेला मोफत बूस्टर डोस अभियान महिन्याअखेर बंद होणार आहे. केवळ पंधरा दिवस शिल्लक असल्याने दोन्ही डोस घेऊन सहा महिने झालेल्यांनी तत्काळ अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. आतापर्यंत शहरात साडेतीन लाखांवर नागरिकांनी बूस्टर डोस घेतला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये १८ वर्षावरील बूस्टर डोससाठी शेवटचे १५ दिवस शिल्लक आहेत. केंद्र सरकारने ७५ दिवस नि:शुल्क बूस्टर डोस अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. ३० सप्टेंबरला ७५ दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे निःशुल्क डोस अभियान बंद होणार आहे. मनपा आणि शासकीय रुग्णालयाच्या केंद्रांवर नि:शुल्क बूस्टर डोस उपलब्ध आहे.

१२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेव्हॅक्स लस उपलब्ध आहे. पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

या केंद्रांवर लसीकरण

झोन लसीकरण केंद्र

लक्ष्मीनगर - कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर, जयताळा यूपीएचसी, जयताळा, खामला यूपीएचसी, खामला नागपूर

धरमपेठ - फुटाळा यूपीएचसी, अमरावती रोड, सदर रोग निदान केंद्र, सुदामनगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप, केटीनगर यूपीएचसी, हजारीपहाड यूपीएचसी, डिक दवाखाना, धरमपेठ, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर.

हनुमाननगर - मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर, नरसाळा यूपीएचसी, हुडकेश्वर यूपीएचसी

धंतोली - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (फक्त कोवॅक्सिन), बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूलजवळ, आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा, एम्स हॉस्पिटल, मिहान (कोवॅक्सिन + कोविशिल्ड)

नेहरूनगर - बिडीपेठ युपीएचसी, ताजबाग यूपीएचसी, नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी, दिघोरी यूपीएचसी, जिजामातानगर.

गांधीबाग - महाल रोगनिदान केंद्र, भालदारपुरा यूपीएचसी, मेयो हॉस्पिटल (फक्त कोविशिल्ड), मोमिनपूरा यूपीएचसी, डागा हॉस्पिटल.

सतरंजीपुरा - मेहंदीबाग यूपीएचसी, कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, जगनाथ बुधवारी यूपीएचसी, शांतीनगर यूपीएचसी, सतरंजीपूरा यूपीएचसी.

लकडगंज - डिप्टी सिग्नल यूपीएचसी, संजयनगर, पारडी युपीएचसी, भरतवाडा युपीएचसी, विजयनगर, हिवरीनगर यूपीएचसी.

आशीनगर - पाचपावली यूपीएचसी लष्करीबाग, कपिलनगर यूपीएचसी, शेंडेनगर यूपीएचसी, शेंडेनगर, बंदे नवाज यूपीएचसी, गरीब नवाज यूपीएचसी, आंबेडकर हॉस्पिटल, कामठी रोड (फक्त कोवॅक्सिन)

मंगळवारी - गोरेवाडा यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती, इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग, नारा यूपीएचसी.

१७ लाख पात्र नागरिक

आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत एकूण ४३,३६,५७७ कोविड प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आल्या. यात पहिला डोस घेणारे २१,९२,१३८ तसेच दुसरा डोस घेणारे १७,७८४२४ नागरिकांचा समावेश आहे. विभागाने निर्धारित लक्ष प्राप्त केले असून उर्वरित नागरिकांनी सुद्धा बूस्टर डोस घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.