
नागपूर : निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाडांची संख्या कमी होत असल्याने केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गिधाडांच्या जिवावर बेतणारे ‘निमसुलाइड’ नावाच्या औषधावर केंद्र सरकारने बंदी आणली आहे. ‘भारतीय औषध तांत्रिक सल्लागार मंडळा’ने या औषधाच्या वापरावर बंदी आणण्याची शिफारस केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.