चंद्रपूर : वाघांच्या हल्ल्यात दोन ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrapur Gadchiroli Two people death in tiger attack

चंद्रपूर : वाघांच्या हल्ल्यात दोन ठार

चंद्रपूर : जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सीतारामपेठ जंगलात घडली. मृताचे नाव जाईबाई महादेव जेंगठे (वय ६५ रा. मोहुर्ली) असे आहे.

जाईबाई जेंगठे या शनिवारी सकाळी सीतारामपेठ जंगलातील कक्ष क्रमांक ९५६ परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. तेंदूपत्ता संकलित करीत असतानाच वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. ही बाब सोबतच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली. वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. मून, क्षेत्रसहायक आर. एस. महातव, वनरक्षक एस. ए. मंगाम वनरक्षक, पी. एस. वायाळ, राठोड, मंदूलवार, देशमुख, मट्टामी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. मृताच्या कुटुंबीयास तातडीने ५० हजारांची मदत देण्यात आली. या ठिकाणी वाघाची ओळख पटविण्याकरिता कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला आहे.

Web Title: Chandrapur Gadchiroli Two People Death In Tiger Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top