

Chandrapur Congress dispute :
esakal
नागपूर : चंद्रपूर महापालिकेचा निकाल जाहीर होताच खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना पळवायचे कारण काय असा सवाल उपस्थित करून खासदारांनी वडेट्टीवार यांच्या निष्ठेवर शंका घेतली असल्याने हा वाद आता प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचला आहे. यावेळी खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार चंद्रपूर शहरात गरजेपेक्षा जास्त लुडबूड करीत असल्याचा आरोपही केला.