

Mild earthquake tremors were recorded in parts of Chandrapur district, including Ballarpur and Rajura
esakal
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी (ता. १६) एकाच दिवसात भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. दुपारी ४ वाजून १४ मिनिटांनी पहिला, तर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दुसरा धक्का बसला. या दोन्ही भूकंपांची तीव्रता अनुक्रमे ३.२ आणि २.८ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली.