
नागपूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आज नागपूर आणि अमरावतीच्या पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली. विशेष म्हणजे बावनकुळे दुसऱ्यांदा नागपूरचे पालकमंत्री झालेले आहेत. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात ते नागपूरचे पालकमंत्री होते. ऊर्जामंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी उपराजधानीच्या विकासात मोठा हातभार लावला.