chef vishnu manoharsakal
नागपूर
Chef Vishnu Manohar : विश्वविक्रमाकडे वाटचाल! शेफ विष्णू मनोहरांनी केले बारा तासात आठ हजार ५२० दोसे!
विष्णू मनोहर यांनी ‘न थांबता २४ तास डोसे बनविणे’ आणि ‘२४ तासात जास्तीत जास्त डोसे बनविणे’ असे दोन विश्वविक्रम स्थापित करण्यासाठी वाटचाल सुरू केली.
नागपूर - ‘विष्णूजी की रसोई’चा परिसर सकाळपासून खवय्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. एकीकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर दोसे तयार करत होते तर दुसरीकडे लोकांनी दोसा-चटणी खाण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
सकाळी सात वाजता विष्णू मनोहर यांनी ‘न थांबता २४ तास डोसे बनविणे’ आणि ‘२४ तासात जास्तीत जास्त डोसे बनविणे’ असे दोन विश्वविक्रम स्थापित करण्यासाठी वाटचाल सुरू केली.
गिरीशभाऊ गांधी खुले रंग मंचावर तीन वेगवेगळ्या भट्टयांवर तीन तवे ठेवण्यात आले होते.
