
कामठी (जि. नागपूर) : कामठी-नागपूर मार्गावरील भिलगाव शिवारातील अंकित पल्स अँड बोर्डस प्रायव्हेट लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीत गरम पाण्याचा रिऍक्टर नोझल पाईपचा स्फोट झाल्याने सात कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. उपचारादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला. सुधीर रामेश्वर काळबांडे (वय ४२, दत्तनगर, कन्हान, ता.पारशिवनी) असे मृत कामगाराचे नाव आहे.