Chhagan Bhujbal : मंत्री झाल्यानंतर प्रथमच; छगन भुजबळ आज नागपुरात
Nagpur Visit : मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ यांचा नागपूर दौरा शुक्रवारी होणार असून, ते विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला येणार आहेत.
नागपूर : मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उद्या शुक्रवारी (ता.२३) प्रथमच नागपूरला येत आहेत. ते एका लग्न समारंभासाठी नागपूरला येणार आहेत.