
नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शिवरायांची प्रेरणा नव्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.