
कामठी : बालविवाह न करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी सतत जनजागृती होत असूनही आजही क्वचित असे बालविवाह होत असतात. अशीच एक घटना कामठी नगरपरिषद क्षेत्रात जुने कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी घडली. यात एक नाही तर दोन १५ वर्षीय मुलीचे २२ मे रोजी होणारे लग्न नऊ दिवसापूर्वीच थांबविण्यात आले. आता या दोन्ही अल्पवयीन मुलींना जुने कामठी पोलिसांकडून बुधवारी बालविकास समितीसमोर उभे केले जाणार आहे.