esakal | मिरचीलाही करोनाची भिती, वाचा नेमके काय...

बोलून बातमी शोधा

red chilli.

जगभरात लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. मिरचीची निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. देशात आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यातही सर्वाधिक उत्पादन आंध्रप्रदेशात होते.

मिरचीलाही करोनाची भिती, वाचा नेमके काय...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारतीय मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये करोना संसर्गाची लागण असल्याने मिरचीच्या निर्यातीत वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसात मिरचीच्या दरात प्रतिकिलो 40 ते 50 रुपयांची घट झाली. बाजारात मिरचीची आवक वाढली असताना निर्यात कमी झाल्याने भावात आणखी घट होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा - ते लहान मुलं आणि महिलांसह महागडे कपडे घालून आले अन...

जगभरात लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. मिरचीची निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. देशात आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यातही सर्वाधिक उत्पादन आंध्रप्रदेशात होते. येथे प्रत्येक गावात मिरचीचे कोल्ड स्टोअरेज तयार करण्यात आलेले आहेत. गतवर्षी खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात सर्व राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्याचा फटका मिरची उत्पादनाला बसला होता. पावसामुळे उत्पादन घटल्याने सर्वच मिरचीचे भाव आकाशाला भिडले होते. तेजा प्रति किलो 200 ते 220 रुपये पोहचला होता. परंतु, आता निर्यात कमी झाल्याने आणि आवक वाढल्याने भाव घटू लागले आहेत. सध्या ठोक बाजारात गुंटूर लाल मिरची 90 ते 130 रुपये प्रति किलो, लवंगी वारंगल 130 ते 140, तेजा क्वालिटी 130 ते 140 रुपये वारंगल दिपीका 150 ते 160 व मांढळची रोशनी मिरची 100 ते 110 रुपये प्रति किलोच्या भावाने विकल्या जात आहे. सर्वात तिखट म्हणून ओळख असलेल्या चपाटाचे दर सर्वाधिक 170 ते 180 रुपये प्रति किलो सुरू आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत निर्यात थांबविण्यात आलेली आहे. आवक वाढल्यानेच भावात घट झालेली आहे. चीनमधील निर्यात थांबताच तेलासह मिरचीचे भावही घटू लागले आहे.
कळमना मिरची बाजारात चिखली, बुलडाण्याहून आठ ते दहा हजार पोते, मांढळहून 3000, गुंटूर आंध्रमधून 8000 पोत्यांची आवक झालेली आहे. निर्यात बंद झालेली असताना मिरचीचे भाव घटले आहेत. मात्र, ठोक बाजारात मिरचीचे दर कमी असले तरी किरकोळ बाजारात चढ्या दरातच विकल्या जात आहे.
घरगुती ग्राहक वार्षिक साठवणूकीसाठी जानेवारी ते मे या कालावधीत मिरची खरेदी करतात. मात्र, हवी तशी मागणी सध्या नाही असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.