
नागपूर : तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत जास्त झालेले आहे. तरीही, तांदळाच्या किमतीत वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे विदर्भात होणाऱ्या चिन्नोर तांदळाच्या दरात वाढ झालेली आहे. नागपुरातील इतवारी आणि ब्रह्मपुरीच्या व्यापाऱ्यांनी सिंडिकेट तयार करून या तांदळाची कृत्रीम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळेच बाजारात तांदळाचे भावात विक्रमी वाढ झालेली आहे.