
नागपूर : शहरातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र म्हणून सदर येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाची ओळख आहे. मात्र, सद्यःस्थितीत हे रुग्णालयच आजारी अवस्थेत आहे. ब्रिटिशकालीन जर्जर झालेली इमारत, जागोजागी तुटलेले छत व मोडकळीस आलेले दरवाजे अशा स्थितीत येथील रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णालयाची एकूणच झालेली दुरवस्था लक्षात घेता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने या रुग्णालयाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.