Crime News : क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी; दोन्ही गटातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Violence Case : मोठ्या कारणांशिवाय दोन गटांत हाणामारी झाली असून, या झटापटीत दोन महिलांचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा : क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी व दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी दोन्ही गटातील पाच जणांविरुद्ध सोमवारी (ता. १७) सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.