नागपूर - वडिलांची नोकरी सुटल्याने घरी आर्थिक चणचण सुरू झाली. घरातील खर्च भागविता येणेही कठिण झाल्यामुळे मुलीने पैसे कमाविण्यासाठी नेपाळ गाठल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत नेपाळमधून परत आणले.
कळमना ठाण्याच्या हद्दीत राहणारी नितू (वय-१५, बदललेले नाव) ही दहा वर्गात शिकते. तिला एक लहान बहिण आणि आई-वडील असे आनंदी कुटुंब आहे. काही महिन्यांपूर्वी खासगी काम करणाऱ्या वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती बिघडली. शिकवणी वर्गाची फी सुद्धा थकली.