Nagpur News : महिला अधिकाऱ्याला मारण्याची धमकी; विभागात खळबळ, घरासमोर लिपिकाने घातला गोंधळ
Police Investigation : नागपूरमध्ये लिपिकाने महिला अधिकाऱ्याच्या घरासमोर गोंधळ घालून जिवे मारण्याची धमकी दिली. प्रतापनगर पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
नागपूर : स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज प्रलंबित ठेवल्याचा समज करून एका लिपिकाने महिला अधिकाऱ्याच्या घरासमोर गोंधळ घालून त्यांना चक्क जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने विभागात खळबळ उडाली आहे.