नागपूर - नागपूरचा नवा महापौर कोण होणार याची उत्सुकता लवकरच संपणार आहे. आरक्षणाच्या सोडतीने महापौर महिला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता कुणाला लॉटरी लागते याकडे लक्ष आहे..भाजपकडे निवडून आलेल्या महिला नगरसेविकांची फौज आहे. यातून एकीला निवडण्याची कसरत करावी लागणार आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय शिवानी दाणी यांच्यासह नीता ठाकरे, दिव्या धुरडे, विशाखा मोहोड, अश्विनी जिचकार यांच्या नावाची जोरात चर्चा आहे.महापालिका निवडणुकीत भाजपने १०२ जागा जिंकून बहुमत मिळवले. आता महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. मागील पंधरा वर्षांचा विचार केल्यास नागपुरात अनुसूचित जमाती, सर्वसाधारण, सर्वसाधारण ओबीसी, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली होती..गेल्या २०-२५ वर्षांमध्ये आतापर्यंत अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघालेले नाही. त्यामुळे यावेळी याच प्रवर्गासाठी आरक्षण निघेल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून बांधण्यात येत होता. परंतु हा अंदाज फोल ठरला. नागपूर मनपाचा कारभार हा महिलाच हाकणार हे गुरुवारी निश्चित झाले..मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून यापूर्वी आमदार संदीप जोशी आणि नंदा जिचकार यांना महापौरापदाचा मान देण्यात आला होता. नीता ठाकरे या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. दहा वर्षांपासून त्यांच्या नावाची चर्चा आहे. गत निवडणुकीत मात्र, त्यांचा पराभव झाला होता. आता त्या पुन्हा निवडून आल्या आहेत. त्यांचासुद्धा महापौरपदावर दावा राहणार आहे.दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील दिव्या धुरडे सलग चारदा निवडून आल्या आहेत. गत कार्यकाळात भाजपने त्यांना महापालिकेच्या प्रतोद करून त्यांचे नाव आघाडीवर आणले आहे..शिवानी दाणी यांचे नाव आघाडीवरमहापौर पदावर भाजप कुणाची वर्णी लावणार याबाबत अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी शिवानी दाणी यांचे नाव आघाडीवर आहे. त्या भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) मध्ये कार्यरत आहेत. त्या भाजयुमोच्या शहर अध्यक्षाही राहिल्या आहेत.सध्या युवा मोर्चाच्या महासचिव असून अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची इन्व्हेस्टर ॲडव्हायजर म्हणून सीएमओमध्ये नियुक्तीही केली आहे. काही वर्षांपासून त्या राज्याच्या अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक व्याख्याने घेतात. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्याच दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३६ मधून त्या निवडूनही आल्या आहेत. त्यामुळे त्या प्रबळ दावेदार मानल्या जातात..२००७ पासूनचे आरक्षण, महापौर व कार्यकाळमहापौर - कार्यकाळ - आरक्षणमाया इवनाते - मार्च २००७ ते डिसेंबर २००९ - अनुसूचित जमातीअर्चना डेहनकर - डिसेंबर २००९ ते मार्च २०१२ - सर्वसाधारण महिलाप्रा. अनिल सोले - मार्च २०१२ ते सप्टेंबर २०१४ - सर्वसाधारणप्रवीण दटके - सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१७ - ओबीसी सर्वसाधारणनंदा जिचकार - मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ - सर्वसाधारण महिलासंदीप जोशी/दयाशंकर तिवारी - नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२२ - सर्वसाधारण? - जानेवारी २०२६ ते पुढील अडीच वर्षे - सर्वसाधारण महिला.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.