Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या गडावर

शिवसैनिकांमध्ये उत्साह; सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन
cm eknath shinde visits nagpur to ramtek fort 20th or 23rd january politics
cm eknath shinde visits nagpur to ramtek fort 20th or 23rd january politicsEsakal

Nagpur News : संपूर्ण देश अयोध्येला जाण्याच्या तयारीत असताना या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या गडावर येणार आहेत. २० ते २३ जानेवारी यापैकी ते कुठल्या दिवशी येणार याची माहिती लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शिवसैनिक कामाला लागले आहेत.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने लढलेल्या सर्व मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे शिवसैनिकांचे मेळावे घेणार आहेत. त्यात रामटेकचाही समावेश आहे. शिवसैनिकांना बुस्टर देण्यासाठी ते प्रत्येक मतदारसंघात जाणार आहेत.

रामटेकचे गडमंदिर हे रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. त्यामुळे ते गडावर जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे समजते. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी ६ जानेवारी ही तारीख दिली होती. मात्र त्यात आता बदल करण्यात आला.

ही तारीख पुण्याला देण्यात आली आहे. २३ तारीख निश्चित झाल्यास ते थेट अयोध्येवरून नागपूरला दाखल होतील असा अंदाज रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला. शिंदे सेना आपल्या सर्व लोकसभा मतदारसंघात सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

याकरिता मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवसेनेच्यावतीने बुथ बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. शिवदूत असे त्यास नाव देण्यात आले आहे. याचाही आढावा यनिमित्ताने घेतला जाणार आहे.

प्रथमच मुख्यमंत्री गड चढणार

राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. अनेकांनी रामटेकला भेट दिली मात्र गडावर दर्शनासाठी आजवर कोणी गेले नाही. एकनाथ शिंदे रामटेकच्या गडावर जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणारे पहिले मुख्यमंत्री ठरतील, असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com