CM Devendra Fadnavis: अण्णा भाऊ साठेंनी दाखवलेल्या मार्गावर राज्य सरकार चालेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Maharashtra Politics: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार वंचितांच्या विकासासाठी अण्णाभाऊंच्या विचारांच्या मार्गावर चालेल.
नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून समजाला दाखविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य सरकार मार्गक्रमण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.