
गडचिरोली : नुकत्याच संमत झालेल्या जनसुरक्षा विधेयकाला विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेस कडवा विरोध करत आहे. कारण काँग्रेसचे नेते राहुल गांधी केवळ डावे नव्हे तर अतिडावेग्रस्त झाले आहेत. ते आदेश देतात आणि त्यानुसार त्यांच्या पक्षातील लोकं विधेयकाला विरोध करतात, अशी टी का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २२) केली. आता माओवादग्रस्त ही गडचिरोली जिल्ह्याची ओळख पुसली जात आहे. आता हातावर मोजण्याइतकेच सशस्त्र माओवादी शिल्लक आहेत. त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.