CM Devendra Fadnavis : जलसंवर्धन, जलपुनर्भरण काळाची गरज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Water Conservation : जलसंकटावर मात करण्यासाठी जलसंवर्धन, जलपुनर्भरण व पाण्याचा पुनर्वापर हीच काळाची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे मांडले.
नागपूर : जलसंवर्धन, जलपुनर्भरण, पाण्याचा पुनर्वापर केल्याशिवाय जलसमस्येतून बाहेर येता येणार नाही. या पाण्याचा उपयोग उद्योग आणि शेतीसाठी करता येऊ शकतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.