
नागपूर : मेंदूपासून ते हृदयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंडाच्या दुर्धर व्याधींपासून ते नवजात शिशू आणि रस्ते अपघातात जायबंदी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून थेट उपचाराचे सुरक्षा कवच मिळते. या कक्षाद्वारे अवघ्या ४ महिन्यात ७६१ जणांवर उपचार झाले. यासाठी ६ कोटी ६७ लाख ३२ हजार ५०० रुपये मुख्यमंत्री निधीतून उपलब्ध करून देण्यात आले.