
नागपूर : नारळ उत्पादनात घट झाल्याने केसाला लावण्यासाठी उपयोगात येणारे नारळाचे तेल आता ग्राहकांचे खिसे हलके करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात नारळ तेलाचे दर ३० ते ४० टक्क्यांनी कडाडले आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कच्च्या मालाच्या, विशेषतः खोबऱ्याच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.