जिल्हाधिकाऱ्यांनी एका कारखान्यावर ठोठावला दोन लाखांचा दंड, कारण आहे...

file
file

टेकाडी (जि.नागपूर): पारशिवनी तालुक्यातील सूर्यअंबा स्पिनींग मिल्स, नयाकुंड हे कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. दररोज होणाऱ्या कोरोनाच्या रुग्ण वाढीमध्ये सर्वाधिक रुग्ण मिल्समधून पुढे येत असल्याने तालुका प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. अशात बुधवारी तालुक्यात ९० रुग्ण बाधित आढळले. त्यातील ७० बाधित रुग्ण एकट्या सूर्यअंबा स्पिनींग मिल्स येथील कामगार आहेत. कंपनीविरोधात कोरोना नियमांचे पालन न करता कंपनीमधून कोरोनाचा संसर्ग वाढविल्याच्या आरोपाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कंपनीवर तालुका प्रशासनाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

कारखाना ठरला ‘हॉटस्पाट’
लॉकडाउननंतर नयाकुंड स्थित सूर्यअंबा स्पिनींग मिल्स येथील काही कामगार बाधित आढल्यानंतर प्रशासनाने येथील कामगारांची कोरोना संबंधात तपासणी करायला सुरवात केली. दिवसागणिक कंपनीमधून बाधितांची संख्या वाढीवर आहे. अशात सध्या ही कंपनी कोरोना ‘हॉट स्पॉट’ म्हणून उदयास आली असल्याचे चित्र आहे. मिलमध्ये मागील दोन महिन्यात परराज्य, जिल्ह्यातील आणि स्थानिक कामगारांना कामावर रुजू करण्याआधी सर्वांची कोरोना चाचणी करून चौदा दिवसांच्या विलगीकरणात ठेवणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आले असताना कंपनीकडून कुठल्याही कामगाराची कोरोना तपासणी व विलगिकरण केलेले नसल्याचे पुढे आले आहे. कामगारांकडून काम करून घेताना मास्क आणि सामाजिक अंतर बाळगणे अनिवार्य असताना कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आले होते. कंपनी मालक आणि व्यवस्थापकांनी शासनाने कोरोना संदर्भात निर्गमित केलेल्या नियमांची पायमल्ली केलेली असल्यानेच सुर्यअंबा कंपनीमध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने वाढून बधितांचा आकडा १५० च्या वर गेला आहे.

हेही वाचाः श्‍वानाला म्हटले हाडंऽऽऽ, पण मालकाला वाटली शिवी, आणि मग घडले महाभारत...

अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल होणार !
संसर्ग रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कंपनीकडून करण्यात आल्या नसल्याचे तहसीलदार वरून कुमार सहारे यांच्या निदर्शनास आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तहसीलदारांनी दोन लाखांचा दंड कंपनीविरोधात ठोठावला असून पाच दिवसात दंडाची रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा आदेश देण्यात आला आहे. तालुक्यातील कांद्री कोविड केंद्रात आज घेण्यात आलेल्या १०२ रॅपिड टेस्टमध्ये २० बधितांचा समावेश आहे, तर पारशिवनी येथील ७०, एकूण बुधवारी ९० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

कामठीत ३७ नवीन पॉझिटिव्ह
कामठीः तालुक्यातील पंधराशे पार पोहोचलेली रुग्णसंख्या व मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे. आज पुन्हा ३७ रुग्ण आढळले. तालुक्याची रूग्णसंख्या १६१२ झाली असली तरी तालुक्यात तब्बल १३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. २५५ रुग्ण अॅक्टिव आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्यावर पोहोचले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढ होत असून आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील विविध भागातील तेरा व ग्रामीण भागातील नऊ तर कामठी छावणी परीषद क्षेत्रातील पंधरा रुग्णांचा समावेश आहे. तर शहरातील जुनी तेलघानी तीन, गुड ओली, गवळी पुरा येथील प्रत्येकी दोन तर हैदरी चौक, रमा नगर, नेहरू नगर, न्यू भाजी मंडी व उपजिल्हा रुग्णालय येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णामध्ये कोराडी, रणाळा, महादुला येथील प्रत्येकी दोन रुग्णाचा समावेश आहे. मागील एक महिन्यात ३६ महिला व २३ पुरुष असे सतत एकामागे एक ५९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात शहरातील विविध भागातील ३५, ग्रामीण भागातील २० यात सर्वाधिक येरखेडा येथील आठ आहेत तर छावणी परिषद क्षेत्रातील चौघांचा मृत्यू झाला आहे.

संपादनः विजयकुमार राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com