
नागपूर : शहरात विविध कामांसाठी खोदण्यात येत असलेल्या खड्ड्यांच्या विषयावर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी अतिशय सतर्क झाले आहेत. उपराजधानीत विविध संस्थांकडून जोमाने विकासकामे सुरू आहेत. त्यामुळेच नागपूर स्मार्ट सिटीतर्फे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कमध्ये बिघाड होत आहे. याला रोखण्यासाठी स्मार्ट सिटीतर्फे मार्गदर्शक कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली. खोदकाम करण्यापूर्वी सर्व विभागांना स्मार्ट सिटीकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.