Nagpur News: सुरगाव खाण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार मोबदला; कृपाल तुमाने यांनी उपस्थित केला होता प्रश्न
Krupal Tumane: उमरेड तालुक्यातील सुरगाव खाणीच्या खड्ड्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या पाच कुटुंबियांना आता मोबदला मिळणार आहे. सरकार आणि खाणधारक यांच्यातील बैठक लवकरच आयोजित होणार आहे.
नागपूर : उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारात खाणीच्या खड्ड्यात बुडून झालेल्या दुर्दैवी घटनेतील पाच मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश होता.