नागपूर : कोरोनाबळी वाढल्याने चिंता, शहरातील १० जणांचा समावेश

१४ बाधितांचा मृत्यू
Nagpur Corona News Update
Nagpur Corona News Updatesakal

नागपूर : गेल्या नऊ दिवसांत आज प्रथमच बाधितांचा आलेख तीन हजारांच्या खाली आला. परंतु, कोरोनाबळींची संख्या अचानक १४ पर्यंत पोहोचल्याने चिंतेत भर पडली. आठ महिन्यानंतर बळींच्या आकड्याने दुहेरी संख्या पार केली. विशेष म्हणजे कोरोनाबळींमध्ये शहरातील दहा जणांचा समावेश आहे. बुधवारी जिल्ह्यात(ता.२६) सहा बाधितांचा मृत्यू झाला. गेल्या चोविस तासात २ हजार ८७१ नवे बाधित आढळून आले. (Nagpur Corona News Update)

Nagpur Corona News Update
नांदेड : रिक्त पदांमुळे कृषी विभाग सलाईनवर

दररोज वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येने प्रशासनाच्या जिवाला घोर लागला. परंतु गेल्या चोविस तासांत २ हजार ८७१ नवे बाधित आढळून आली. बाधितांची संख्या गेल्या नऊ दिवसांत प्रथमच तीन हजारापेक्षा कमी आहे. परंतु मृत्यूच्या वाढत्या संख्येने प्रशासन व जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ग्रामीणमध्ये मृत्यूची संख्या कमी असली तरी शहरात मात्र वाढत आहे. गेल्या चोविस तासांत नोंद झालेल्या १४ बळींमध्ये शहरातील दहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण मृत्यू संख्येचा आलेख सहा हजारांच्या जवळ पोहोचला आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या १० हजार २०३ पर्यंत पोहोचली आहे. एकूण नोंद झालेल्या बळींपैकी ४ जण जिल्ह्याबाहेरील आहेत. ग्रामीण भागात एकाही मृत्यूची नोंद नाही.

Nagpur Corona News Update
औरंगाबाद : पोषण आहार रकमेसाठी द्या विद्यार्थ्यांचे बॅंक खाते क्रमांक

दरम्यान आज नोंद झालेल्या बाधितांपैकी शहरातील दोन हजार २७ तर ग्रामीणमधील ७५५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ८९ जण बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५ लाख ५० हजार १६० पर्यंत पोहोचली. यात शहरातील ३ लाख ८३ हजार ३४१ तर ग्रामीण भागातील १ लाख ५८ हजार १९० जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ८ हजार ६२९ जण आहेत. बाधितांची संख्या कमी व कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याने सक्रीय रुग्णांतही घट झाली. आज २८ हजार ४०२ सक्रीय रुग्ण आहेत.

४३७३ कोरोनामुक्त

गेल्या काही दिवसांत बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या फारच कमी होती. आज मात्र बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ४ हजार ३७३ बाधितांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील ३ हजार ११८ तर ग्रामीण भागातील १ हजार १५३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील १०२ जण कोरोनातून सावरले. जिल्ह्यातील कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या ५ लाख ११ हजार ५५५ पर्यंत पोहोचली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com