

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या (Nagpur Legislative Council Election) आदल्या दिवशी काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार बदलवून रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांना चांगलाच धक्का दिला. त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Independent Candidate Mangesh Deshmukh) यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) मतदारांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. नाट्यमय बदलामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. भोयर यांचा पाठिंबा काँग्रेसने काढल्यामुळे देशमुख आणि चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) या दोघांमध्ये थेट लढत होत आहे.
रवींद्र भोयर प्रचार करीत नसल्याने दोन तीन दिवसांपासून काँग्रेसमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला होता. सुमारे पंधरा दिवसांचा वेळ असतानाही ते एकाही मतदारांना भेटले नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेसुद्धा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आरामात विजयी होतील असे चित्र दिसत होते. मात्र, काँग्रेसचे नेते अचानक सक्रिय झाले होते. दोन दिवसांपासून त्यांनी बैठका घेणे सुरू केले. बुधवारी दिवसभर प्रमुख नेत्यांचे बैठक सत्र सुरू होते. याबैठकीला अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख हेसुद्धा उपस्थित होते. तत्पूर्वी काँग्रेसच्या मतदारांचासुद्धा कौल जाणून घेण्यात आला होता. त्यानंतर उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याकरिता काँग्रेसच्या हायकमांडकडे पत्र पाठवण्यात आले होते. त्याला बुधवारी रात्री उशिरापर्यंत उत्तर देण्यात आले नव्हते. त्यामुळे काँग्रेस संभ्रमात पडली होती. तत्पूर्वी नेत्यांनी मात्र आपल्या मतदारांपर्यंत संदेश पोचवणे सुरू केले. गुरुवारी साडेसात वाजताच्या सुमारास प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र काँग्रेसच्या वतीने व्हायरल करण्यात आले.
काय म्हटले पत्रात? -
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. याची माहिती मतदान करणाऱ्या सर्व काँग्रेसच्या सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना द्यावी असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.
पत्रावर शंका -
रवींद्र भोयर यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आग्रह धरला होता. त्यांनी त्यांची हमीसुद्धा घेतली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांच्या स्वाक्षरीने भोयर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून पत्र काढण्यात आले होते. उमेदवार बदलण्यासाठी दिल्लीच्या हायकामांड कडे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र उमेदवार बदलल्याचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले होते. त्यामुळे या पत्रावरसुद्धा शंका घेतल्या जात आहे.
भाजपच हा माझा भूतकाळ आहे. आता मी काँग्रेसमध्ये आहो. पक्ष सोडताना जाहीर केल्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोबतच राहील, असं रविंद्र भोयर यांनी सांगितलं आहे.
एकूण मतदार - ५५९
महापालिका - १५५
जि.प. - ७१
न.प. - ३३३
मतदान केंद्र - १५
पक्षीय बलाबल -
काँग्रेस- १४४
भाजप -३१४
राष्ट्रवादी- १५
शिवसेना- २५
विदर्भ माझा-१७
इतर -१७
शेकाप- ०६
अपक्ष- १०
बसप- १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.