Conocarpus Tree Ban : ‘कोनोकार्पस’ वृक्षांची महाराष्ट्रात लागवड; गुजरातसह चार राज्यात बंदी
Maharashtra Green Policy : कोनोकार्पस झाडामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने चार राज्यांनी बंदी घातली असून महाराष्ट्रातही त्यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे.
यवतमाळ : पर्यावरणाला हानिकारक असलेल्या ‘कोनोकार्पस‘ झाडावर देशातील चार राज्यात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या झाडाची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या संदर्भात काही वृक्षप्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.