
नागपूर : महापालिकेने कोणत्याही फेरीवाल्याला (हॉकर्स) कधीही परवाना दिला असल्यास आणि त्याचे कोणत्याही कारणाने नूतनीकरण केलेले नसले तरी अशा परवानाधारक हॉकर्सविरुद्ध कारवाई करता येणार नाही, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २०२३ मध्ये दिले आहेत. परंतु, सीताबर्डी येथील फेरीवाल्यांना हटविण्यात येत असल्याचा आरोप करीत नागपूर फेरीवाला फुटपाथ दुकानदार संघटनेचे महासचिव रज्जाक कुरैशी यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. न्यायालयाने महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांना अवमानना नोटीस बजावली.