
नागपूर : राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला हजारो कोटी रुपये खर्च होत असल्याने सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडला असताना राज्य सरकारने तीन वर्षांपासून ९० हजार कोटी रुपयांची बिले थकवली आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.