
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीसाठी इच्छुकांनी अर्ज सादर केले. यंदा प्रथमच निवड प्रक्रियेत समितीने अर्जाच्या नमुन्यामध्ये बदल करीत, यंदा प्रथमच अर्ज भरताना नमुन्यात ‘पोस्ट डॉक्टरल रिसर्च’ हा कॉलम जोडला. मात्र, विद्यापीठ कायद्यातील कुलगुरुपदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये अशी कुठल्याही शैक्षणिक पात्रतेचा समावेश नसताना, त्याचा समावेश करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.