
नागपूर ः कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत महापालिकेने (Nagpur Nmc) शहरातील नागरिकांना मनपा, खासगी व शासकीय रुग्णालयांत बेड (Corona beds) उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मागील वर्षी केवळ ९८९ बेड असलेल्या शहरात वर्षभरात ६ हजार ७५६ बेडची भर पडली. कोरोनाच्या काळात अनेकांना बेड मिळाले नसले तरी अनेकांना वाढीव बेडमुळे दिलासा मिळाला. (Corona beds increased in Nagpur in last one year)
मागील वर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाच रुग्णालयात साडेचारशे बेड वाढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची त्याचवेळी बदली झाली. त्यानंतर सप्टेंबरपासून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बेड्स वाढविण्याचे शिवधनुष्य उचलले. यात महापौर दयाशंकर तिवारी व इतर पदाधिकाऱ्यांनीही साथ दिल्याने मागील वर्षी केवळ ९८९ बेड्स असलेल्या शहरात आजच्या स्थितीत ७ हजार ७४५ बेड उपलब्ध आहेत.
शासकीय, खासगी आणि मनपा रुग्णालयांमध्ये हे बेड उपलब्ध आहेत. १ एप्रिल २०२० रोजी ८०५ ऑक्सिजनयुक्त बेड्स होते. १८४ आयसीयू तर ८७ व्हेंटिलेटर असलेले बेड्स होते. आता शासकीय, मनपा आणि खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ४८६५ ऑक्सिजनयुक्त, २२७४ आयसीयू तर ५८१ व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत.अतिरिक्त आयुक्त लज शर्मा यांनी खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या वाढविण्यावर भर दिला होता. दरम्यान मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात शिरकाव केला.
आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये तर दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ मध्ये रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. मागील वर्षी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मनपा प्रशासनाने नियोजन करून टप्प्याटप्प्याने बेड्सची संख्या वाढविली.
(Corona beds increased in Nagpur in last one year)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.