कोरोना रुग्णांचे हाल! चार ते पाच तास प्रवास करत नागपूरला आणूनही मिळत नाहीत बेड्स

corona patients not getting beds even travel for 4 to 5 hours in nagpur
corona patients not getting beds even travel for 4 to 5 hours in nagpur

जलालखेडा (जि. नागपूर ) : नरखेडचे तीन रुग्ण गंभीर असून ते ऑक्सिजनवर आहेत. त्यांना एकदा नाही तर दोन तीन वेळा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथेही त्यांच्यासाठी खाटा उपलब्ध न झाल्याने व खासगी रुग्णालयात उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांना पुन्हा नरखेड कोविड केअर सेंटरमध्ये परत आणण्याची दुर्दैवी वेळ आली. ते आता ऑक्सिजनवर असून येथेच औषधोपचार घेत आहेत. आता पुढे अनुचित घटना घडलीच तर याला जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. 

सध्या नरखेड तालुक्यात २८८ रुग्ण अ‌ॅक्टिव्ह असून यातील २४४ रुग्ण घरीच विलगिकरणात, ३१ रुग्ण नरखेड येथील कोविड केअर सेंटर व १३ रुग्ण नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण कोविड केअर सेंटरमधील ३ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांचा spo2 कमी असून त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. यांना दोन तीन वेळा नागपूर येथे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. पण आधी आरक्षित केलेले बेड्स रुग्ण पोहोचेपर्यंत भरल्यामुळे त्यांना कुठेच बेड्स मिळाले नाही. खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना पुन्हा परत आणण्यात आले. आता त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्येच ऑक्सिजनवर ठेऊन औषधोपचार केले जात आहेत. 

नरखेड हे नागपूरपासून १०० किलोमीटर आहे. बेड्स आरक्षित केल्यानंतर रुग्णवाहिकेने रुग्ण रुग्णालयात पोहोचविण्यासाठी तीन ते चार तास लागतात. या वेळेत आरक्षित बेड्स भरून जातात. त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळत नाही व पुन्हा परत आणले जाते. इतकी वाईट परिस्थिती आहे. 

मदना गाव कोरोनाचे नवीन 'हॉटस्पॉट' 
नरखेड ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाही मागील चार पाच दिवसात मदना या लहानशा गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या गावात ३२ रुग्ण अ‌ॅक्टिव्ह असून ३१ घरीच विलगिकरणात आहेत, तर एक रुग्ण नरखेड येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनवर आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वेखंडे यांनी सांगितले. 

तीन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले होते. हे रुग्ण पोहोचेपर्यंत आरक्षित बेड्स भरल्यामुळे त्यांना बेड्स मिळाले नाही. आता त्यांचा उपचार कोविड केअर सेंटर मध्येच सुरू आहे. त्यांची प्रकृती व वय पाहता त्यांना नागपूर येथे भरती करणे आवश्यक आहे, पण बेड्स मिळत नसल्याने काहीच होऊ शकत नाही. 
- डॉ.वळकस, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, नरखेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com