कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर झोपडपट्ट्यांवर नजर ठेवण्याची गरज; वैद्यकीय तज्ज्ञांचं मत

कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर झोपडपट्ट्यांवर नजर ठेवण्याची गरज; वैद्यकीय तज्ज्ञांचं मत

नागपूर ः महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोविडच्या चाचणीसाठी (Corona Testing) रुग्ण रुग्णालयात येण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा शहरातील हेल्थपोस्टच्या माध्यमातून झोपडपट्टीतील प्रत्येक नागरिकांच्या घरी भेट देऊन रुग्णशोध मोहीम (Corona patients) सुरू करण्याची गरज आहे. मात्र कोरोना नियंत्रणात असल्यामुळे महापालिका आता सुस्त होत असल्याचे चित्र आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागाने झोपडपट्ट्यांवर नजर ठेवण्याची गरज आहे. आतापासूनच कोरोनामुक्तीचे नागपूर पॅटर्न तयार करण्यासाठी सज्ज व्हावे, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेतून पुढे आला. (corona Testing should necessary in slums to avoid third wave)

कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर झोपडपट्ट्यांवर नजर ठेवण्याची गरज; वैद्यकीय तज्ज्ञांचं मत
आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

उपराजधानीत तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यात लहान मुलांसाठी धोक्याची घंटा असल्याचे सुतोवाच करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नागपुरातील साडेचारशे झोपडपट्ट्यांमध्ये योग्य नियोजनाची गरज आहे. नागपूर शहरातील ३० लाख लोकसंख्येपैकी सुमारे १० लाख लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. तर येथील दोन लाख मुलांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

नागपुरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटस्पॉट ठरलेल्या गर्दीच्या वस्त्यांचे विलगीकरण केले होते. यामुळे कोरोना त्या झोपडपट्ट्यांच्या अंतर्गत भागात शिरू शकला नव्हता. हाच पॅटर्न मुंबईच्या धारावीतही राबवला गेला. घरोघरी भेट देऊन अचूक आणि सूक्ष्म नियोजनाच्या बळावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण शोधून तो कसा ‘रिकव्हर' होईल, याचे नियोजन करण्याची आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मेडसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.

हेल्थपोस्टमध्ये नियंत्रण कक्ष

नागपूर महानगरपालिकेचे विविध वस्त्यांमध्ये हेल्थपोस्ट आहेत. हे हेल्थपोस्ट प्रत्येक साथ आजारावरील नियंत्रणासाठीचे नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉररूम म्हणून वापर झाल्यास कोरोनासारख्या साथीच्या आजारावर सहज नियंत्रित करता येतात, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला. वॉर्ड वाररुममध्ये दर दिवसाला पाच हजार रुग्ण व संशयित रुग्ण हाताळल्यास कोरोनावर सहज नियंत्रण मिळवता येईल.

झोपडपट्ट्यामंध्ये आरोग्य यंत्रणेकडून नेहमीच दुर्लक्ष होते. मात्र तिसऱ्या लाटेत या भागातील लहान मुलांवर नजर ठेवण्याची गरज आहे. संशयित रुग्णांच्या शोधासाठी व्यापक मोहीम, संस्थात्मक विलगीकरण, घरोघरी जाऊन, फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष वस्ती शिबिरांतून गुणवत्तापूर्ण मोहीम राबवण्याची गरज आहे. यासाठी अंगणवाडी, आशा सेविकांची मदत घेता येते.
-डॉ. प्रशांत पाटील, विभागप्रमुख, मेडिकल, नागपूर.

(corona Testing should necessary in slums to avoid third wave)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com