esakal | गरीबांची टँकरमागे धावाधाव बंद, झोपडपट्टीत प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोडणी
sakal

बोलून बातमी शोधा

corporation tap connection to everyone house in slum area of nagpur

झोपडपट्टीतील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी सार्वजनिक नळावर अवलंबून राहावे लागत होते. यासाठी अनेकदा दूरवर पायपीट करावी लागत होती. अऩेकदा पाण्यासाठी टँकरच्या मागे धावावे लागत होते.

गरीबांची टँकरमागे धावाधाव बंद, झोपडपट्टीत प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोडणी

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील झोपडपट्ट्यांमधील प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोडणी देण्यात आल्याने गरीबांची टँकरच्या मागे धावाधाव बंद झाली. शहरातील अनेक झोपडपट्ट्या टँकरमुक्त झाल्या असून काहींची टँकरमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. झोपडपट्टीतील प्रत्येक घराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी स्पष्ट केले. 

झोपडपट्टीतील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी सार्वजनिक नळावर अवलंबून राहावे लागत होते. यासाठी अनेकदा दूरवर पायपीट करावी लागत होती. अऩेकदा पाण्यासाठी टँकरच्या मागे धावावे लागत होते. झोपडपट्टीतील बहुतांश घरांमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी किमान एका सदस्याला रोजगारास मुकावे लागत होते. सार्वजनिक नळांभोवती तयार झालेले गटारामुळे नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबतही खात्री नव्हती. या स्थितीत २४ बाय ७ योजना सुरू करण्यात आली. परिणामी अनेक झोपडपट्‍ट्‍यांमधील घरांत आता स्वतंत्र नळ देण्यात आले. महापालिका-ओसीडब्लूच्या या प्रकल्पामुळे गरीब वस्त्यांतील नागरिकांना पाण्याची चिंता नसून प्रत्येकालाच रोजगारासाठी बाहेर निघणे शक्य झाले. नियमित पाणीपुरवठ्यामुळे घरातील प्रत्येकाला कामासाठी बाहेर पडणे शक्य झाल्याचे रामबाग वस्तीतील प्रकाश नागदेवे यांनी नमुद केले. मुलांनाही आता शाळा बुडविण्याची गरज राहिली नसल्याचेही नागमोते म्हणाले. 

गरीबांना पाणी दरात सवलत दिल्याने देयके भरणेही सहज शक्य झाल्याचे ते म्हणाले. २४ बाय ७ प्रकल्पाची बांधणी झोपडपट्टीवासियांचा विचार करून करण्यात आली होती, असे झलके यांनी सांगितले. झोपडपट्टीतील प्रत्येक घराला नियमित पाणीपुरवठा करण्यास आम्ही बांधील आहोत. यातून त्यांच्या आयुष्यांवर सकारात्मक प्रभाव पडल्याचेही ते म्हणाले. 
 

loading image
go to top