
दारव्हा (जि. यवतमाळ) : मुरुमाच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची भीती दाखवून ४० हजारांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकारी, तीन तलाठी तसेच एका खासगी व्यक्तीला रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ लाच लुचपत विभागाने गुरूवारी (ता. २४) सायंकाळी ५ वाजता तालुक्यातील बागवाडी येथील बसस्थानकावर घडली.