

Yavatmal Crime
Sakal
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : रागाच्या भरात स्वतःच्या पोटच्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला जमिनीवर आदळून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम बापाला केळापूर सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. १९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पिंटू सुधाकर चव्हाण (वय २७ रा. गणेशपूर-वाई, केळापूर), असे जन्मठेप ठोठावलेल्या आरोपी बापाचे नाव आहे.