नागपूर शहरातून वाढली गायींची तस्करी, कत्तल!

गोहत्या व तस्करीवर कायद्याने बंदी घातल्यानंतरही नागपुरातून अन्य राज्यात गायींची तस्करी आणि शहरात कत्तल करून गोमांस विक्री धडाक्यात सुरू आहे.
नागपूर शहरातून वाढली गायींची तस्करी, कत्तल!
sakal

नागपूर : गोहत्या व तस्करीवर कायद्याने बंदी घातल्यानंतरही नागपुरातून अन्य राज्यात गायींची तस्करी आणि शहरात कत्तल करून गोमांस विक्री धडाक्यात सुरू आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेचे युनिटचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.

नागपूर शहरातून वाढली गायींची तस्करी, कत्तल!
औरंगाबाद: शहरातील ५० वसाहतींची जातिवाचक नावे बदलणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१५ पासून गोहत्या बंदी कायदा लागू राज्यात लागू करण्यात आला. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी असलेल्या कत्तलखान्यांवर पोलिसांचे छापे पडले आणि काही दिवस राज्यातील कत्तलखाने बंद पडले. परंतु काही महिन्यांतच पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळे कत्तलखाने आणि गोतस्करी सुरू झाली.

एवढ्यात गायींच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून उपराजधानी हे तस्करीचा केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे. नागपूर शहराच्या हद्दीत अनेक ठिकाणी चोरून लपून नव्हे तर उघडपणे कत्तलखाने सुरू आहेत. नुकताच टेका नाका परिसरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्या परिसरात पाच ते सहा गोमांस विक्रेत्यांनी पोलिसांवर हल्लासुद्धा केला होता.

पाचपावली, तहसील, जरीपटका,सक्करदरा, नवीन कामठी, जुनी कामठी, यशोधरानगर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडपणे कत्तलखाने सुरू आहेत. अन्सारनगर रेल्वेपुलाजवळ नवाब, वकील, सोनू आणि इकबाल हे गोमांस विक्री तसेच कत्तलखाने चालवितात. तर फवारा चौकात आरिफ, सेवासदन अहतेशाम, गणी, गुड्डू, मोहसीन, गोलू तर मोमीनपुऱ्यात आरिफ, जावेद, आसिफ असून सदरमधील गड्डीगोदाममध्ये जमशेद, तनवीर, प्यारे यांचाही समावेश आहे.

डॉक्टर करतो ‘सेटिंग’?

नागपूर शहरातील काही कत्तलखाने अजूनही सुरू आहेत. काहींना पोलिसांचा थेट आशीर्वाद आहे तर नागपुरातून अन्य राज्यात गाईंची तस्करी वाढली आहे. टेकानाक्यातील डॉक्टर हा ‘सेटिंग’ करीत असून पोलिसांचा छापा पडण्यापासून वाचवितो. एका आटोडिलचा संचालकांचे पोलिसांशी मधूर संबंध असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com