तिनेच बोलाविले होते टॅटू पाहण्यासाठी...

अपहरण-गोळीबार प्रकरणाला नवीनच वळण
crime kidnapping shooting case girl called him to see tattoo amravati
crime kidnapping shooting case girl called him to see tattoo amravatisakal

अमरावती : दोन दिवसांपूर्वी आपण टॅटू काढला होता. तो पाहण्यासाठी म्हणून गबरू ऊर्फ अस्मित अनिल खोटे (वय २५) याला नागपूरवरून अमरावतीत बोलाविले होते. त्याने कोणतीही बळजबरी केली नाही, असे युवतीने (वय २५) आपल्या प्राथमिक बयाणात सांगितल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

मंगळवारी (ता. आठ) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास अमरावतीच्या बालाजी प्लॉट परिसरात एका युवतीचे कार्यक्रमातून दोघांनी हवेत गोळीबार करून अपहरण केले. ही युवती नातेवाईकाकडील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. राजापेठ पोलिसांचे एक पथक गत दोन दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून आहेत. अपहरण झालेल्या युवतीचा शोध घेऊन तिला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. मंगळवारी (ता. आठ) येथील राजापेठ पोलिसांनी गबरू ऊर्फ अस्मित अनिल खोटे, शानू ठाकूर, प्रमेश अधपाके, प्रफुल्ल दमाये या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघे अद्यापही पसार आहेत.

अपहरण करणारा गबरू ऊर्फ अस्मित अनिल खोटे व त्याचा दुसरा साथीदार पसार आहे. राजापेठ पोलिसांनी सदर युवतीचे प्राथमिक बयाण नोंदविले. बहिणीच्या घरासमोर गबरूसोबत बोलत असताना तिचा दीर बाहेर आला. त्याने गबरूसोबत बोलण्यासाठी टोकल्यामुळे हा प्रसंग उद्भवला. गबरूसोबत दोन वर्षांपूर्वी नागपुरात भांडण झाले होते, असेही युवतीने तिच्या बयाणात सांगितल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपले अपहरण झाले नसून स्वत:हून गबरूसोबत दुचाकीवर गेल्याचे तिने बयाणात सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com